esakal
महाराष्ट्र बातम्या

Kishor Aware: तळेगावातील जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारेंची निर्घृण हत्या

आवारे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष होते

रुपेश नामदास

तळेगाव: जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून शुक्रवारी (ता.१२) पावनेदोनच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते.

दरम्यान दबा धरून बसलेल्या अज्ञात शस्त्रधारी इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सदर घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

किशोर आवारे यांना पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ.निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. कोरोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT