Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : मोचा चक्रीवादळाचा परिणाम! राज्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात काही भागांमध्ये पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम देशासह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी उष्णता वाढत आहे. 17 मे पासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट देण्यात आला आहे.

मोचा चक्रीवादळ रविवारी म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं असून त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून उशिरा येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 15 मे पासून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

IMD ने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवार, 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर जाताना छत्री स्कार्फचा वापर करावा असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT