Dahihandi 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Dahihandi 2023 : ठाण्यातल्या जय जवान पथकाचा थरार! राज ठाकरेही भारावले; म्हणाले...

संतोष कानडे

ठाणेः मुंबईमध्ये दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण आणि परिसरात अनेक पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे उभे करुन दहीहंडी उत्सव साजरा केला. ठाण्यातल्या नौपाड्यात मनसेच्या दहीहंडीची चर्चा आहे. स्वतः राज ठाकरे येथे उपस्थित होते.

नौपाड्यामध्ये १० थर रचून दहीहंडीचा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये पथकं आहेत. जय जवान पथकाने नऊ थर रचले. स्वतः राज ठाकरेंनी हा थरार पाहिला. जय जवान गोविंदा पथक स्वतःचा विक्रम मोडून दहाव्या थरापर्यंत मजल मारु शकेल, अशी शक्यता आहे. स्वतः राज ठाकरेंनी गोविंदांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आयुष्यातली ही पहिलीच वेळ असेल, मी इतका वेळ व्यासपीठावर उभा राहून काहीच बोललो नाही. 'जय जवान'च्या सर्व जवानांना माझा सलाम. सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा. सर्वांनी काळजी घेऊन दहीहंडी उत्सव साजरा करावा, असं ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सणांवर अनेकदा बंदी आणण्याचे प्रयत्न झाले परंतु मी ठाम उभा राहिलो. कोर्टामार्फतही बंदी आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र दहीहंडी होणार, कोर्टाला जी कारवाई करायची ती करावी. हिंदू आणि मराठी सणांवरच बंदी आणत राहणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT