Raj Thackeray Uddhav thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

MNS : ठाकरेंच्या शिवसेनेला मनसैनिकांनी पुन्हा डिवचलं; आता लक्ष प्रत्युत्तराकडे

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार यावरून सध्या राजकारण तापलेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dasara Melava Controversy : यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार यावरून सध्या राजकारण तापलेले असताना, आता मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे. याबाबत मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत सेनेवर बोचरी टीका केली आहे.

दसरा मेळावा वाद रंगलेला असताना मनसे नेते गजानक काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेच्या दसरा मेळावा नसून ‘टोमणे मेळावा’ असे संबोधले आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गजानन काळेंचं नेमकं ट्वीट काय?

गजानन काळे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील मेळावा दसरा मेळावा नसून टोमणे मेळावा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे“मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देवून टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये असेही काळे यांनी म्हटले आहे.

ठाकरेंची स्क्रिप्ट बारामतीवरूनच

काळे यांनी एवढ्यावरच शांत न बसता आगामी दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट तशीही बारामती वरूनच येणार आहे. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?”, असा खोचक प्रश्नदेखील गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अरविंद सावंत आणि विनायक राऊतांनी या प्रश्नाचं उत्तर जरूर महाराष्ट्राला द्यावं असेही काळे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT