Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : पवार कुटुंब एकसंध! काकूंच्या भेटीसाठी अजित पवार 'सिल्व्हर ओक'वर

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वी काका शरद पवार यांच्या निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झालेले आहेत. काकू प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी ते गेल्याचं सांगितलं जातंय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सिल्व्हर ओक निवासस्थानी गेले आहे. आज प्रतिभा पवार यांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यामुळेच अजित पवार काकूंच्या चौकशीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं स्पष्ट होत आहे. ९ आमदारांनी २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर आज त्या मंत्र्यांना खाते मिळाले. नेमकं आजच प्रतिभा पवार यांच्यावर उपचार झाले.

काकूंच्या भेटीसाठी अजित पवार त्यांच्या निवासस्थानी गेले. आतमध्ये शरद पवार उपस्थित असल्याचं सांगितलं जात असून काका-पुतण्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, प्रतिभा पवार यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान शरद पवार रुग्णालयात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT