Exam_Students 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : कृषी पदविका आणि तंत्र निकेतनची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द; कृषिमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. 

राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक शुक्रवारी (ता.३) कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह कृषी परिषदेचे संचालक उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी याठिकाणी कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठाच्याअंतर्गत हे महाविद्यालय सुरू होणार आहे.

तसेच, भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार साकोलीमध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला आज मंजुरी देण्यात आली. अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री भुसे यांनी सांगितले.

कृषी राज्यमंत्री कदम म्हणाले, राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षांतील गुणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल. या निर्णयाचा फायदा राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC घोटाळा उघड करणार असल्यानं मला निलंबित केलं, आरोग्य उपसंचालिका गायकवाड यांचे खळबळजनक आरोप

सैफ अली खान इन्स्टाग्रामवर आला अन् सर्वप्रथम करीनालाच फॉलो केलं; पहिल्या पोस्टमध्ये असं काय की, लोक करताय चर्चा

Rohit Sharma MI Captain: रोहित खरंच, Mumbai Indians चा कर्णधार होणार का? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Live News : सोलापूर शहरावरील पाणी कपातीचे संकट टळलं, शहरातील पाणीपुरवठा राहणार सुरळीत..

Rahuri News: पतीचा दवाखाना सुरू करायला २० लाख माहेरून आण, डॉक्टर महिलेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT