Ajit Pawar Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Deepak Kesarkar : "राष्ट्रवादीत त्यांची घुसमट..."; अजित पवारांना शिंदे गटात येण्याची ऑफर

"असा उमदा नेता आमच्यासोबत आला तर का आवडणार नाही?"

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेकदा फेटाळूनही त्यांच्या नाराजीच्या चर्चा सतत होत असतात. यामध्ये आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या एका विधानामुळे भरच पडली आहे. अजित पवार शिंदे गटात आल्यास आम्हाला आनंद होईल, असं केसरकर म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपा आमदार प्रवीण पोटेंसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी "अजित पवारांनी पहाटे ऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर आत्ता ते मुख्यमंत्री असते", असं विधान पोटे यांनी केलं. त्याबद्दल केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोटेंच्या विधानाबद्दल बोलताना दीपक केसरकर म्हणाले, "राजकीय नेत्यांची राजकारणा पलीकडे जाऊन एकमेकांशी मैत्री असते. एकमेकांबद्दल आदर असतो. आम्हा सगळ्यांना अजित पवारांबद्दल आदर आहे. तेही कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे मोकळेपणाने बोलतात. म्हणून मला वाटतं की पोटेंनी मैत्रीपोटी किंवा आदरापोटी ते विधान केलं असेल. अजित पवार आमच्या सगळ्यांसोबत आले, तर आम्हाला आनंदच होईल.राष्ट्रवादीत त्यांची घुसमट होतेय, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे असा उमदा नेता आमच्यासोबत आला तर का आवडणार नाही?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Ghat: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

Yavatmal News : मंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जेवणापासून भेटवस्तूंपर्यंत... प्राजक्ता गायकवाडच्या माहेरच्यांनी असं केलं जावयाचं धोंडेजेवण, म्हणते- कटाच्या आमटीनेच...

Pandharpur News : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध; विश्वासात न घेता उमेदवारी, आमदार अभिजीत पाटील यांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT