Deepak Kesarkar Latest Marathi News Deepak Kesarkar Latest Marathi News
महाराष्ट्र बातम्या

केसरकरांना राष्ट्रवादीचे उत्तर; करून दिली भाजपकडून झालेल्या अपमानाची आठवण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे. केसरकर यांनी शिवसेनेचा इतिहास जाणून घ्यावा. त्यावेळी शिवसेना सोडणाऱ्या लोकांची कारणे केसरकरांना माहीत नसतील. शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील संबंध किती प्रेमळ आहे हे केसरकरांना माहीत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तापसी म्हणाले. तसेच २०१४ साली झालेल्या अपमानाची आठवण त्यांनी करून दिली. (Deepak Kesarkar Latest Marathi News)

दीपक केसरकर यांनी बुधवारी दिल्ली गाठून शरद पवारांवर दोनदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. बाळासाहेब ठाकरे हयात असताना पवारांनी अपमान केला होता. आता त्यांच्या इज्जतीबद्दल बोलत आहे, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले होते. केसरकरांना शिवसेनेचा इतिहास बहुधा माहीत नाही. युतीचे सरकार स्थापन करताना शरद पवारांनीच काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले, असेही प्रतिक्रिया देताना महेश तापसी म्हणाले.

दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेनेतून फारकत घेतल्याचा संदर्भ देत या दोघांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याचे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर शरद पवार बाळासाहेब ठाकरेंचा आदर करण्याविषयी बोलत आहेत. परंतु, ते हयात असताना त्यांना त्रास दिला होता, असे केसरकर म्हणाले होते.

शपथविधी सोहळ्यालाही शिवसेनेला बोलावले नव्हते

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपचे (BJP) सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर साध्या शपथविधी सोहळ्यालाही शिवसेनेला बोलावण्यात आले नाही. मात्र, त्याच शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे आमदार, मुख्यमंत्री आणि प्रवक्ते आज भाजपसमोर गुडघे टेकले आहेत. एकनाथ शिंदे गटाने असे कृत्य केले की बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा नक्कीच दुखावला गेला असेल, असेही महेश तापसी म्हणाले.

दीपक केसरकर हे बेकायदेशीर प्रवक्ते

२०१९ मध्ये शिवसैनिकांचा स्वाभिमान आणि सन्मान राखण्याचे काम शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. केसरकर विसरले की आपण शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी एकत्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले. जगाला माहीत आहे की तुमचे सरकार बेकायदेशीर आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हेही बेकायदेशीर प्रवक्ते आहे, असेही महेश तापसी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT