sakal-exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

पतसंस्थांमधील ठेवींना आता ‘अंशदाना’चे संरक्षण; पतसंस्थांमध्ये ७३ हजार कोटींच्या ठेवी

पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळावे म्हणून आता ठेवीतील शंभर रुपयांसाठी १० पैसे रक्कम पतसंस्थेच्या स्थिरीकरण व स्थरलता सहाय निधीच्या खात्यात जमा होईल. पतसंस्था अडचणीत आली किंवा बुडाली, तरी ठेवीदारांची ठेव अंशदानामुळे सुरक्षित राहणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळावे म्हणून आता ठेवीतील शंभर रुपयांसाठी १० पैसे रक्कम पतसंस्थेच्या स्थिरीकरण व स्थरलता सहाय निधीच्या खात्यात जमा होईल. पतसंस्था अडचणीत आली किंवा बुडाली, तरी ठेवीदारांची ठेव अंशदानामुळे सुरक्षित राहणार आहे. सहकार खात्याने तसा प्रस्ताव सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठविला असून सव्वादोन कोटी ठेवीदारांना त्यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील १९ हजार ८४६ पतसंस्थांमध्ये सव्वादोन कोटी ठेवीदारांची ७३ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका, नागरी बॅंका, फायनान्स कंपन्यांशी स्पर्धा करताना काही अडचणींमुळे अनेक पतसंस्था बुडीत निघाल्या आहेत. १० ते २० वर्षे संघर्ष करूनही अनेकांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत मिळालेली नाही.

आता यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या पुढाकारातून बॅंकांप्रमाणेच पतसंस्थांसाठी देखील अंशदान योजना लागू केली जाणार आहे. नुकतीच पतसंस्था फेडरेशनसमवेत सहकार मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. त्यावेळी फेडरेशनने मांडलेल्या काही मुद्द्यांवर अंतिम निर्णय झाल्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यभर लागू केली जाणार आहे.

तत्पूर्वी, सहकार खात्याने परराज्यातील व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडियाचा देखील अभ्यास केला. त्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी संरक्षित राहाव्यात आणि दुसरीकडे पतसंस्थांवरील सभासदांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून अंशदान योजना लागू करण्याचा कृती आराखडा तयार झाला. नागरी बॅंकांमध्ये पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण (अंशदान योजना) आहे. पतसंस्थांमधील ५० हजार ते एक लाखांपर्यंतच्या ठेवीसाठी अंशदान योजना लागू करण्याचेही प्रस्तावात नमूद आहे.

पतसंस्थांवरील विश्वास वाढेल आणि ठेवीदारांनाही मिळेल संरक्षण

बॅंकांच्या ठेवीप्रमाणे पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळावे आणि ठेवीदारांची रक्कम सुरक्षित राहील, या उद्देशाने अंशदान योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून ठेवीदारांचा विश्वास व खात्री वाढेल आणि पतसंस्थांही बळकट होतील.

- अनिल कवडे, आयुक्त, सहकार

पतसंस्थांची सद्य:स्थिती

  • एकूण पतसंस्था

  • १९,८४६

  • पतसंस्थांमधील ठेवी

  • ७३,००० कोटी

  • एकूण ठेवीदार

  • २.२३ कोटी

अंशदान योजना अशी असणार

बॅंकांमधील ठेवीपोटी शेकडा १२ पैसे अंशदान म्हणून काढलेली रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ठेवली जाते. या धर्तीवर आता पतसंस्थांमधील ठेवींच्या संरक्षणासाठी शेकडा १० पैसे काढून ठेवून ही रक्कम स्थिरीकरण व स्थरलता सहाय निधीत जमा केला जाणार आहे. त्यातून पतसंस्थांमधील ठेवीदारांना संरक्षण मिळेल आणि पतसंस्थांचे व्यवहार देखील सुरळीत चालू राहतील हा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT