devendra Fadanvis reply to ambadas danve over nawab malik jion ajit pawar faction in assembly winter session  
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik : विधान परिषदेत नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; फडणवीस म्हणाले,"आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी..."

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे.

रोहित कणसे

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवशनला हजेरी लावली. इतकेच नाही तर सभागृहात ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत सत्ताधारी बाकांवर जाऊन बसलेय यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसल्याने प्रश्न उपस्थित केला. सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ज्यांच्यावर आरोप झाले होते हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर या आक्षेपाला उत्तर देताना फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळालं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दानवे यांच्या आक्षेपानंतर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील (नवाब मलिक) आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडत आहेत.

आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढलं नाही. याचं उत्तर आधी द्या मग आम्हाला सवाल विचारा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं . यादरम्यान सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं.

आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भुमिका जाहीर केली होती. त्यानंतर मलिक जामीनावर बाहेर आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. मलिक यांच्यावर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता नवाब मलिक हे सत्ताधारी गटात सहभागी झाल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : आसाम रायफल्सच्या वाहनांवर सुखोवीजवळ संशयित IED स्फोट

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT