Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : उद्या 'मविआ'चा मोर्चा अन् फडणवीसांची कोश्यारींसोबत कार्यक्रमाला हजेरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः महापुरुषांचा अवमान, सीमावाद हे मुद्दे घेऊन उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. दुसरीकडे मात्र ज्या राज्यपालांमुळे हा वाद पेटला आहे, त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसून आले.

१९९२साली बांधण्यात आलेली राजभवनातील सचिवालयाची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून नवीन इमारतीचं बांधकाम सुरु होतं. आज फीत कापून इमारतीचा शुभारंभ करण्यात आला.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. ही नवीन इमारत तीन माळ्यांची आहे. यामध्ये तळघर, पहिला आणि दुसरा मजला आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल औरंगाबाद येथे केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. याशिवाय महाराष्ट्र-कर्नाटकचा मुद्दा तापलेला आहे. हेच मुद्दे घेऊन महाविकास आघाडीचा उद्या महामोर्चा निघत आहे. ज्या राज्यपालांच्या विरोधात राज्यात असंतोषाचं वातावरण आहे त्याच राज्यापलांसोबत देवेंद्र फणडवीस दिसले, त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT