Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: "होय मोदींनी लस तयार केली, कारण..." ; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Sandip Kapde

Devendra Fadnavis :  देवेंद्र फडणवीस यांच्या मोदींनी लस तयार केली, या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकारण पेटले होते. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आज साताऱ्यातील कराड येथे बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

फडणवीस म्हणाले, मोदींनी या देशामध्ये कोरोनोची लस तयार केली. मी परवा म्हटलं, तर उद्धवजींना फार झोमलं ते म्हणाले लस मोदी तयार करतात का?. मग उद्धवजी रोज सांगयचे मी राज्य चालवतो. ते काय घोडा हाकत होते की बैलबंडी हाकत होते का.

मी तर म्हणेन होय मोदींनी लस तयार केली त्याच कारण असं आहे. जगात पाच देश लस तयार करु शकले. कारण मोदींच्या संबंधामुळे आपल्याला रॉ मटेरियल मिळालं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदी यांनीच लस तयार केली. कारण जे शास्त्रज्ञ लस तयार करत होते. मोदीजी त्यांच्याकडे गेले. त्यांना मोदींनी १८०० कोटी रुपये दिले. कोरोनाची लस तयार झाली. त्यानंतर भारतातील १४० कोटी लोकांना मोदी यांनी मोफत लस देण्याचे काम केले. महाराष्ट्रात साडेसतरा कोटी मोफत लसी मोदी यांनी दिल्या.

कोरोनाची लस मोदींनी दिली नसती तर आपण इथं बसू शकलो असतो का. काय अवस्था झाली असती आम्ही अमेरिका आणि रशियापुढे कटोरा घेऊन उभे असतो. आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या..., असे म्हटलो असतो. त्यांनी सांगितल असत थांबा आधी आमच्या लोकांना देतो. परिणाम असे झाले असते की आपल्या देशात प्रेतांचा खच पडला असता. आम्हाला इथ बसता आलं नसत. पण या देशाला दूरदर्शी पंतप्रधान मिळाले. त्यांनी हिंमतीने कोरोनाचा सामना केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT