Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : फडणवीसांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर अजित पवार गट दोन पावलं मागे; तटकरे म्हणाले, आम्ही फक्त...

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तारुढ पक्षामध्ये बेबनाव निर्माण झाला आहे

संतोष कानडे

नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तारुढ पक्षामध्ये बेबनाव निर्माण झाला. आर्थिक गैरव्यवहार आणि दाऊदशी संबंधित प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक हे सभागृहात दाखल झाले. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर आरोप करायला सुरुवात केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये कशीबशी वेळ मारुन नेली खरी. मात्र सायंकाळी त्यांनी एक पत्र जाहीर करुन नवाब मलिकांविषयी नाराजी बोलून दाखवली. अजित पवारांना पत्र लिहित फडणवीस म्हणाले, मलिकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, सत्ता येते-जाते मात्र असे आरोप असलेले नेते महायुतीमध्ये येणे योग्य ठरणार नाही.

या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेना, भाजप, शिंदे गट, काँग्रेस, शरद पवार गट यांच्या एकामागोमाग प्रतिक्रिया येत राहिल्या. रात्री उशिरा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्वीट करुन भूमिका मांडली आहे. त्यांच्या ट्वीटनंतर अजित पवार गटाने दोन पावलं मागे टाकल्याचं बोलले जातंय.

सुनील तटकरे यांचं ट्वीट

आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे.

असं ट्वीट सुनील तटकरे यांनी केल्यानंतर अजित पवार गटाला हा विषय संपवायचा असल्याचं दिसून येत आहे. तरीदेखील अजित पवार यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शुक्रवारी सभागृहामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना कसा प्रतिसाद देतात, हेसुद्धा स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT