Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case : 'विधानसभाध्यक्ष स्वतः वकील आहेत, त्यांच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर…'

रोहित कणसे

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सांगितले आहे तसेच याकरिता रिझनेबल वेळ देखील दिला आहे. दरम्यान यावर अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्तुत्तर दिलं आहे.

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत आणि वाजवी वेळही दिली आहे आणि तरीही कोणी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती मुक्त आणि न्याय्य प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे फडणवीस म्हणाले.

तसेच विधानसभा अध्यक्ष हे स्वतः एक चांगले वकील आहेत आणि ते कायद्यानुसार निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

शरद पवारांनाही फडणवीसांचं प्रत्युत्तर

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि फडणीस सरकारने नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. उद्धव ठाकरेंनी ही मागणी केल्यानंतर भाजपकडून प्रत्तुत्तर देण्यात आलं. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही असा टोला लगावला होता.

पवारांच्या या टीकेनंतर, शरद पवारांचा नैतिकतेशी काही संबंध आहे का? आता जर शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच होईल. मग इतिहासात जावं लागेल. वसंतदादांचं सरकार कसं गेलं इथून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ज्यष्ठ नेते आहेत. बोलत असतात. इतकं लक्ष द्यायचं नसतं, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravikant Tupkar : "वीज अंगावर पडून बैलाचा मृत्यू अन् हतबल शेतकऱ्यानं पत्नीलाच जुंपलं अवताला! लातूरमधील 'त्या' व्हिडिओने महाराष्ट्राची मान शरमेने खाली"

Tarapur News : डहाणू लव्ह जिहाद अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; न्यायालयीन प्रक्रिया सुरू

BAN vs AUS 1st ODI: बांगलादेशच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉश इंग्लिससोबत 'राडा' घातला; मॅच जिंकून मालिकेत घेतली आघाडी

Collagen for Skin & Joint Health: कोलेजन खरोखरच त्वचा सुधारण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते का?

Meenakshi Natarajan Nomination Rejected : काँग्रेसला मोठा धक्का! राज्यसभेच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द; भाजपच्या तक्रारीनंतर ऐनवेळी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT