Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : अली जनाब उद्धव ठाकरेंना शोभतं का? मालेगावातील सभेआधी फडणवीसांचा खोचक सवाल

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे यांची कोकणात खेड येथील भव्य सभेनंतर आजा नाशिकच्या मालेगावात आज (२६ मार्च) संध्याकाळी जाहीर सभा होत आहे. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मालेगावात येत आहेत. या सभेसाठी जय्यत तयारी केली आजे आहे. (uddhav Thackeray urdu banners in Malegaon before rally)

मालेगावात या सभेचे शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान मालेगावात काही ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर हे उर्दू भाषेत आहेत. यावरून आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने या बॅनरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

फडणवीस काय म्हणालेत...

उर्दू भाषेत लागलेल्या या बॅनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये कोणी काही म्हटलं तर काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर ते लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.

संजय राऊत काय म्हणाले...

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना प्रतिक्रिया दिली की, उर्दु या देशामधील भाषा नाहीये का? पाकिस्तानात जाऊन देशाची भुमिका मांडणारी भाषा ही उर्दू आहे. ज्या जावेद आख्तर आणि गुलजारांचं आपण कौतुक करतो ते आजही त्यांचं लिखान उर्दु भाषेतच करतात.

आज मंत्री दादा भुसे यांच्या होम ग्राऊंडवरउद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. रत्नागिरीच्या खेडनंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये ठाकरेंची सभा पार पडत आहे. या सभेत उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. या सबेत ठाकरे देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणावर काय भाष्य करतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT