ED Attached Sanjay Raut Property Esakal
महाराष्ट्र बातम्या

ED ची मोठी कारवाई, संजय राऊतांची मालमत्ता जप्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या (ED Action on Sanjay Raut) कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (ED Attached Sanjay Raut Property) यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे. अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. संजय राऊतांसोबत संपर्क साधला असता, ते म्हणाले मला कुठलाही फोन केलेला नाही. मला नोटीस दिलेली नाही. मी दिल्लीत असून मला याबाबत काहीही माहिती नाही.

१ हजार ४८ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई -

ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. आता संजय राऊत देखील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

किरीट सोमय्यांचे संजय राऊतांवर आरोप -

संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आले आहे, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. त्यानंतर राऊतांच्या कुटुंबीयांवर ईडीची छापेमारी झाली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबाबत स्वतः संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT