rohit pawar  
महाराष्ट्र बातम्या

...तरी अजित दादा गप्प का?; 'बारामती अ‍ॅग्रो'वरील कारवाईनंतर रोहित पवारांची पत्रकार परिषद

सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ईडी, सीबीआयला आम्ही सहकार्य केलं आहे. पण, काहीजण सुडाचं राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हातोडा घेऊन गेलेल्यांचा काय झालं, असे अनेक प्रश्न करत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी ज्या शहरात असतात त्याठिकाणी लोकांचे खून होतात. संपूर्ण देशात सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांनी एकतर गृहमंत्रीपद ठेवावं किंवा उपमुख्यमंत्रीपद ठेवावं. एकातरी पदाला न्याय द्यावा अन्यथा त्यांनी गृहमंत्रीदाचा राजीनामा देऊन टाकावा, असं पवार म्हणाले.

ईडीच्या अधिकाऱ्यांवर आमचा आक्षेप नाही. त्यांनी मागितली ती आम्ही मदत करत आहोत. सर्व कागदपत्रं आम्ही दिले आहेत. भाजपला मला एकच विचारायचं आहे. तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप होते त्यांचं काय झालं. मी राजकारणात येण्याआधी व्यवसायात होतो. पण, जे राजकारणात येऊन मोठे व्यावसायिक झाले. त्याचं काय? लोकांना सर्व दिसत आहे, असं ते म्हणाले.

ज्या दिवसांपासून भाजप सरकार सत्तेत आलंय. तेव्हापासून आतापर्यंत चार ते पाच पोलिसांना भाजप आमदारांकडून मारहाण झाली आहे. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. पण, आता नवीन प्रथा सुरु झाली आहे. कांबळे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. अजित दादा त्यावेळी व्यासपीठावरच उपस्थित होते. मग, दादा गप्प का राहिले, असा सवाल रोहित पवारांनी केला.

सगळी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. खरी चूक असती तर देशात परत आलो नसतो. सर्व कागदपत्रं दिली आहेत. पण, भाजप यामध्ये राजकारण करत आहे? खरी चूक केली असती तर दादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो. जे आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई केली जात आहे, असा सवाल त्यांनी केलाय.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

SCROLL FOR NEXT