Sanjay Raut Tagged Sharad Pawar | Sanjay Raut Tweet e sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : शरद पवारांना घाबरवण्यासाठी आरोपपत्रात त्यांचं नाव; न्यायालयाचं निरीक्षण

ईडीने संजय राऊतांना केलेली अटक अवैध असल्याचंही न्यायालयाने राऊतांना जामीन मंजूर करताना म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

संजय राऊतांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांची अटक अवैध असल्याचं नमूद केलं होतं. तसंच आता आणखी एक निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ते म्हणजे आरोपपत्रात शरद पवारांचा उल्लेख फक्त भीती निर्माण करण्यासाठीच होता, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर केला. यावेळी राऊतांची अटक अवैध असल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे. तसंच शरद पवारांबद्दलही महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. आरोपपत्रात शरद पवारांचा उल्लेख केवळ त्यांना घाबरवण्यासाठी ईडीने केला होता. जेणेकरून पवारांना वाटेल की आता पुढचा नंबर त्यांचाच आहे, यासाठीच उल्लेख केला होता, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

ईडीने तपासादरम्यान म्हाडाचे अधिकारी याचा या गैरव्यहरात सहभाग असल्याचे चंदन केळेकर, वाधवन आणि स्वप्ना पाटकर यांनी जबाबात म्हटले होते. मात्र त्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र शरद पवार आणि त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देण्याच्या उद्देशाने किंवा त्यांना घाबरवण्यासाठीच त्यांच्या नावाचा आरोपपत्रात उल्लेख केल्याचं दिसतं, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलेंडर 587 रुपयाने स्वस्त... 10 कोटींहून अधिक लोकांना कसा होत आहे फायदा?

कंगनाच्या आईवडिलांनी तिचे सिनेमे कधीच पाहिले नाही? पहिल्या सिनेमाची आठवण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'त्यांना फक्त बोल्ड सीन्स अन्...'

Maharashtra Dams: राज्यातील धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा ३ टक्क्यांनी घटला; केवळ २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक, पावसाआधीच पाण्याची चिंता वाढली

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT