Chhagan Bhujbal File Photo Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ अन् पुतण्याविरोधातील याचिका ईडीकडून मागे! पुत्र पंकजविरोधातील मात्र कायम

ईडीने याचिका मागे घेतल्याने छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रोहित कणसे

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात ईडीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आला आहे.

छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे ईडीकडून नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे. न्यायालयानेही याचिका मागे घेण्याची ईडीची मागणी मान्य केली आहे. मात्र भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधातील याचिका कायम ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना २०१६ मध्ये अटक देखील झाली होती. तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला ईडीकडून २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीने अजब दावा केला होता.

साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीच्या या दाव्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत याचिका नेमकी कशासाठी केली, हे स्पष्ट करण्यासाठी ईडीला वेळ दिला होता. यानंतर आता ईडीने याप्रकरणी याचिका मागे घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT