mhada sakal
महाराष्ट्र बातम्या

Mhada : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आता मिळणार ‘म्हाडा’ची कामे; गृहनिर्माण खात्याचा निर्णय

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) केली जाणारी कामे करता येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) केली जाणारी कामे करता येणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्याच्या गृहनिर्माण खात्याने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आता ‘म्हाडा’ची १५ लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपर्यंतची कामे सोडत (लॉटरी) पद्धतीने थेट मिळू शकणार आहेत. या निर्णयाचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी स्वागत केले आहे.

आतापर्यंत जिल्हा परिषदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (पी. डब्ल्यू. डी.) सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दहा लाख रुपयांच्या खर्चाच्या मर्यादेपर्यंतची कामे सोडत पद्धतीने दिली जात असत. मात्र याला ‘म्हाडा’च्या कामांचा अपवाद होता. यामुळे ‘म्हाडा’ची कामे मिळावीत, या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना गेल्या अनेक वर्षांची प्रयत्न करत होती. सरकारच्या या निर्णयाने बेरोजगार अभियंत्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. शिवाय यामुळे संघटनेच्या मागणीला यश आल्याची प्रतिक्रिया रवींद्र भोसले यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्याच अभियंत्यांनी त्यांची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना राज्य सरकारच्या सर्वच विभागांतील कामे ही सोडत पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, या निर्णयामुळे ‘म्हाडा’च्या एकूण कामांपैकी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के, सहकारी संस्थांना ३३ टक्के कामे मिळू शकणार आहेत. उर्वरित ३४ टक्के कामे अन्य कंत्राटदारांना खुल्या निविदेद्वारे दिली जाणार आहेत.

उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली काम वाटप समिती

दरम्यान, ‘म्हाडा’तील एकूण कामांपैकी ३३ टक्के कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सोडत पद्धतीने वाटप करता यावीत, यासाठी ‘म्हाडा’तील उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली काम वाटप समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फतच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे वाटप केली जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे संघटनेच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT