eknath shinde stunt esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: एकनाथ शिंदेंची 'स्टंटबाजी'! तलवार, खुर्ची अन् चांदीचा धनुष्यबाण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता मुंबईतील बीकेसीमध्ये सभा सुरु होण्यापूर्वी त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कृतींचे कौतूक होताना दिसतेय.

सकाळ डिजिटल टीम

Eknath shinde Stunt News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता मुंबईतील बीकेसीमध्ये सभा सुरु होण्यापूर्वी त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कृतींचे कौतूक होताना दिसतेय. दुसरीकडे त्यावर सोशल मीडियावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला स्टेजवर बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या खुर्चीत बसून भाषण केले होते त्याची मंत्रोउच्चारात पुजा केली. याशिवाय 20 फुटी तलवारीचे अनावरणही यावेळी करण्यात आले. त्या तलवारीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसनं घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांच्या त्या व्हायरल झालेल्या व्हिड़िओवर वेगवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या एका पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यांनी हातात चांदीचे धनुष्यबाण हाती घेऊन कार्यकर्त्यांना लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. शिंदे यांच्या या हटक्या स्टंटबाजीचं नेटकऱ्यांकडून कौतूक होताना दिसतंय दुसरीकडे अनेकांनी त्यावरुन शिंदे यांना वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT