Eknath Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ''दिल्ली जेवढं फडणवीसांचं ऐकते तेवढं शिंदेंचं ऐकणार का?''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच आता या दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Delhi Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच आता या दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. दिल्ली जेवढं देवेंद्र फडणवीस यांचं ऐकते तेवढं एकनाथ शिंदेंचं ऐकेल का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी उपस्थित केला आहे. ते हिंगोलीत बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत नसतील तर, कदाचित दिल्ली हायकमांडची भेटही होणार नाही असा टोलाही पाटील यांनी लगवाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकटे दिल्लीला जाऊन काय उपयोग असा सवाल उपस्थित करत शिंदेंसोबत फडणवीसांनीही दिल्लीला जावं असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला आहे.

उद्या दिल्लीत काय खलबतं शिजणार?

एकीकडे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदेंसोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हेदेखील दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात नेमकी काय खलबतं शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या भेटीदरम्यान राज्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन मंत्र्याशिवाय संदीपान भूमरेदेखील दिल्लीला जाणार आहेत. राज्याच्या विकासासाठी केंद्रातर्फे जी आवश्यक मदत हवी आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा?

दरम्यान, दुसरीकडे राज्यातील दुसरा मंत्रीमंडळ विस्तारदेखील रखडला आहे. तो केव्हा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे या दौऱ्यादरम्याव शिंदे गडकरी आणि दानवे यांच्यासोबत विस्ताराबाबत काही चर्चा करणार का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

UNESCO Kas Plateau : कास पठारावर अवतरला जागतिक स्तरावर दुर्मीळ असलेला 'सातारी तुरा'; समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर उगवणारी 'ही' वनस्पती नेमकी आहे तरी काय?

Sankashti Chaturthi 2026: संकष्टीचा उपवास करताय ? चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ...

SCROLL FOR NEXT