Maratha Reservation Protest 
महाराष्ट्र बातम्या

Maratha reservation : जरांगे पाटलांच्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मराठा आरक्षणासाठी...

रवींद्र देशमुख

मुंबई - जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाचा आज १०वा दिवस असून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहे. आज सरकारच्या जीआरनंतर ते उपोषण सोडतील असं वाटलं होतं. मात्र त्यांनी आरक्षणावर ठाम असल्याचं सांगितलं. तसेच सुधारित जीआर आणि पाणी सोबतच आणा असं खडसावून सांगितलं. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आऱक्षणाबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. जे आरक्षण देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. ते आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं. दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण रद्द झालं. मविआच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. आता तेच राजकारण करत आहेत.

दरम्यान मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकार कटिबद्ध आहे. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्रुटी काढल्या त्यावर काम करून मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करण्याच काम सरकार करेल आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करेल. मराठा आरक्षण देताना सरकार कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता, आरक्षण देईल, असंही शिंदे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT