Light Bill News esakal
महाराष्ट्र बातम्या

Electricity Bill : वीज बिल भण्यासाठी ऑनलाईन लिंक देवून फसवणाऱ्या दोघांना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः तुमचं वीजबिल थकलंय, त्यामुळे तुमची वीज जोडणी तोडण्यात येईल; अशा धमक्या मोबाईलवरुन येत असतात. मग वीजबिल भरण्यासाठी एक लिंक येते. त्यावर क्लिक केलं की पैसे कट होतात. त्यानंतर पश्चातापाशिवाय पर्याय उरत नाही. असंच ठगवणाऱ्या दोन ठगांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील शिवडी पोलिसांनी झारखंडमधील रांची येथून दोन जणांना वीजबिल भरण्यासाठी बनावट ऑनलाइन लिंक पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. वीरेंद्र अशोक लोहरा आणि उमेश परमेश्वर साव अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

या दोघांनी किती लोकांकडून पैसे उकळले आणि त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल आहेत का? याबाबत शिवडी पोलिस तपास करीत आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांची वीजबिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक होत असते. अशा फेक लिंकवर क्लिक करु नये, याबाबत वारंवार सजग केलं जातं. परंतु असे सायबर गुन्ह्याचे प्रकार वरचेवर वाढतच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT