Maharashtra Budget Session 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget Session : 'खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना विचारली जात', पवार संतप्त; मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण

रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात 6 मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यावरुन आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, केंद्राकडून चूक दुरुस्त केली जाईल, असा शब्द सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. (Farmer Caste query for Buying Fertilizer Maharashtra Budget Session Ajit pawar sudhir mungantiwar )

सांगलीतल्या प्रकारावरून अजित पवारांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली आहे. खतांची खरेदी करताना सांगलीत शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. मशीनमध्ये जातीचा रकाना भरल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाहीये.

याप्रकरणी सरकारने तातडीने पावलं उचलावीत. यामध्ये कोण मुद्दाम गडबड करतोय, त्याचा आढावा सरकारने घ्यावा. ई पास प्रकरणी चौकशी करुन त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणीही पवारांनी यावेळी केली.

त्यानंतर, वन, सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्याकडून सदरचा प्रश्न केंद्राला विचारला आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. चूक झाल्यास ताक्ताळ सुधारणा करु. कोणत्याही सरकारने जातीची अट घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पद्धतीचे अपडेटस् आले आहेत. खत घेताना दुकानदारांकडून जातीची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना आपली जात सांगावी लागत असल्याने बळीराजांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकर्‍यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते.

त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशीन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्‍यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT