fire ajji chandrabhaga shinde meets cm uddhav thackeray amide maharashtra political crisis  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : तो गेलाय, पण तुम्ही घाबरू नका; फायरआजींनी घेतली CM ठाकरेंची भेट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात एकनाथ शिदे यांच्या बंडानंतर राजकीय स्थिती अस्थिर झाली आहे. शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत सापडले आहे.दरम्यान पुष्पा चित्रपटातील डायलॉगमुळे प्रसिध्द झालेल्या फायर आजींनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ते कट्टर शिवसेनैकी असतील तर तर परत येतील असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत. (fire ajji chandrabhaga shinde meets cm uddhav thackeray amide maharashtra political crisis)

एकाही आमदाराने समोर येऊन सांगावं, लगेच मुख्यमंत्रिपद सोडतो, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होतीी. त्यानंतर त्यांनी वर्षा निवसस्थान सोडत मातोश्रीवर गाठलं. दरम्यान 92 वर्षांच्या या शिवसैनिक आजीही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी पुढे आल्या आहेत.

तुम्ही काही काळजी करू नका शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही काळजी घ्या. तो रिक्षावाला होता तो आमदार-खासदार झाला, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा असेही आजींनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे आजी यावेळी म्हणाल्यात.

तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ नये, असेही त्या म्हणाल्या. बंड केलेल्या शिवसेनेच्या आमदारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ते कट्टर शिवसैनिक असले, तर साहेबांकडे माघारी येतील.. जे गेले ते गेले... ते शिवसैनिक नाहीत. एकनाथ शिंदे माफी मागायाला येतील... उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाहीत, असे सांगत उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत तेच मुख्यमंत्री राहतील असे आजी म्हणाल्या

कट्टर शिवसैनिक असलेल्या या आजी जेव्हा राणा दांपत्य जेव्हा मातोश्री या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार होते तेव्हा शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनात चंद्रभागा शिंदे या आजींनी त्या निदर्शनांमध्ये भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT