wardha fire news esakal
महाराष्ट्र बातम्या

जैन एरिगेशनचे कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक; दिवसभरात आगीची दुसरी घटना

सकाळ डिजिटल टीम

Wardha fire news: आर्वी तालुक्यातील धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातून उपसा सिंचनाचे काम सुरू आहे. या कामाकरिता ठेवण्यात आलेल्या साहित्याला अचानक आग लागली. ही आग शॉट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) दुपारच्या सुमारास लागली.

आग लगाल्याचे लक्षात त्यावर ताबा मिळविण्याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत सिंचनासाठी ठेवण्यात आलेले कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचा कोळसा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत येथील काम जैन एरिगेशन या कंपनीला देण्यात आले आहे. शासनाच्या या योजनेंतर्गत आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना ड्रीप लाऊन देत त्यांना मोफत सिंचनाची सोय देण्यात येत आहे. या कामाकरिता जैन एरिगेशनने मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले आहे. हे साहित्य या आगीत जळून खाक झाले. लागलेल्या या आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत आहेत.

दरम्यान, सकाळी एक आगीची भीषण घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात केमिकल टँकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT