दिवाळी कीट

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्त कुटुंबांना मिळणार २५ वस्तूंचे ‘दिवाळी कीट’! प्रत्येक किटमध्ये २१०० रुपयांचे साहित्य; किटमध्ये ‘या’ वस्तू, सोलापूर जिल्ह्यात ११,८०५ कुटुंब पूरग्रस्त

सप्टेंबरमधील महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदी काठावरील ११ हजार ८०५ कुटुंबांचा संसार पुरात वाहून गेला. या पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांना शासनाकडून २५ वस्तूंचे दिवाळी कीट मिळणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सप्टेंबरमधील महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदी काठावरील ११ हजार ८०५ कुटुंबांचा संसार पुरात वाहून गेला. या पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांना शासनाकडून २५ वस्तूंचे दिवाळी कीट मिळणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

सीना नदीला आलेल्या पुरामुळे चार लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरूच असून पंचनामे पूर्ण होऊन नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर शासनाकडून मदत मिळायला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी, १८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबरला दीपावली पाडवा आणि २३ ऑक्टोबरला भाऊबीज आहे.

दिवाळीपूर्वी बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर करून सर्वांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीसाठी आधार म्हणून २५ वस्तूंचे किट दिले जाणार आहे. त्यात तांदूळ सोडून सणाला लागणाऱ्या बाकीच्या सर्व वस्तू त्यात असणार आहेत.

दिवाळी किटमध्ये ‘या’ वस्तू

सण-उत्सवात गोरगरिबांना आनंदाचा शिधा दिला जात होता. आता सरकारने तो बंद केला. पण, पूरस्थितीमुळे आणि दिवाळी तोंडावर असल्याने बाधितांना विशेष दिवाळी किट दिले जाणार आहे. त्यात टूथब्रश, टूथपेस्ट, अंघोळीचे व कपडे धुवायची साबणे, मेणबत्ती, केसाचे तेल याशिवाय गहू, साखर, हरभरा डाळ, तेल, गूळ अशा दिवाळीला लागणाऱ्या २५ वस्तू असणार आहेत. किटची किंमत प्रत्येकी २१०० रुपये असणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने या किटचे वाटप होणार आहे.

पूरग्रस्तांना मिळेल थोडी भरपाईही...

पूरग्रस्तांसाठी शासनाच्या वतीने दिवाळी कीट मिळणार आहे. याशिवाय दिवाळीत कुटुंबातील मुलांसह पती-पत्नींना नवे कपडे खरेदी करता यावेत म्हणून शासनाकडून बाधित कुटुंबांना पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई देखील देण्याचे नियोजन सरकार स्तरावरून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT