Flying Kiss Controversy 
महाराष्ट्र बातम्या

Flying Kiss Controversy: देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधींचे लग्न गरजेचे; चित्रा वाघ यांचा सल्ला

Sandip Kapde

Flying Kiss Controversy:  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल (बुधवार) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरीव चर्चेदरम्यान भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणानंतर वाद निर्माण झाला. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला आहे.

याबाबत भाजपच्या अनेक महिला खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही करण्यात आली आहे. भाजपकडून देशात अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहेत.

भाजप महिला आघाडीकडून आज मुंबईत आंदोलन करण्यात येत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी विनंती केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, लोकशाहीच्या मंदिरात निंदनीय घटना घडल्या. मणिपूरचा मुद्दा मांडत असताना राहुल गांधी यांना फ्लाईंक कीस केला. त्यांच्या कृत्याला ठाकरे गट आणि काँग्रेसने समर्थन दिले. रोड रोमियो आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर देखील त्यांची मानसिकता तशीच आहे.  Flying Kiss Controversy

सोनिया गांधी यांना आम्ही विनंती केली आहे की राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे लग्न करुन टाका. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांचे लग्न होणे गरजेचे आहे. कधी डोळे मारतात, कधी कधी मिठी मारतात, आता फ्लाईंग किस केला. लोकशाहीचे मंदीरात अनेक निर्णय घेतले जातात. त्या ठिकाणी अभद्र कृती शोभत नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा अपघात, रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना उडवलं, थरार CCTVमध्ये कैद

Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, विदर्भातील दोघांचा समावेश, तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश

दत्तकपुत्र होता बॉलिवूडचा हा सुपरस्टार ! आईनेच काका-काकूंच्या केलं होतं स्वाधीन; मामाने बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT