महाराष्ट्र बातम्या

बोम्मईंच्या मंत्रिमंडळात जोल्ले, कत्तींचा वरचष्मा; मिळाली 'ही' खाती

उमेश कत्ती याना अन्न व नागरी पुरवठा तर जोल्ले यांना धर्मादाय खाते

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी केलेल्या खातेवाटपात उमेश कत्ती (Umesh Katti) यांच्याकडील अन्न व नागरीक पुरवठा खाते कायम ठेवण्यात आले आहे. शशीकला जोल्ले (Shashikala Jolle) यांचे खाते बदलण्यात आले आहे. बी. एस. येडीयुराप्पा (B. S. Yeddyurappa) मुख्यमंत्री असताना जोल्ले यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते होते. आता त्यांना धर्मादायस हज व वक्फ खाते देण्यात आले आहे. त्यामुळे जोल्ले यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह ३० मंत्र्यांचे खाते वाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. कत्ती यांच्याकडील खाते बदलून त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा होती, पण त्यांचे आधीचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. बांधकाम खाते सी सी पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. जोल्ले यांच्याकडील महिला व बालकल्याण खाते आचार हालप्पा बसाप्पा यांच्याकडे देण्यात आले आहे. गेली दोन वर्षे शिक्षण खाते सांभाळणाऱ्या एस. सुरेशकुमार यावेळी मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षणखात्याची जबाबदारी बी. सी. नागेश यांच्याकडे देण्यात आली आहे. येडीयुराप्पा यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री असलेल्या व आता बेळगावचे पालकमंत्री म्हणून निवड झालेल्या गोविंद कारजोळ यांच्याकडे पाटबंधारे खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कत्ती यांच्याकडील खाते बदलून त्याना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा होती.

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील याना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांच्याकडील वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी शंकर बी पाटील मुंचनकोप्प यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लक्ष्मण सवदी यांनाही यावेळी मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांच्याकडून परीवहन खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार? याबाबत उत्सुकता होती. ते खाते यावेळी बी श्रीरामलू यांच्याकडे देण्यात आले आहे. येडीयुराप्पा यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री अर्थसह अनेक महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. येडीयुराप्पा यांच्या मंत्रीमंडळात बेळगाव जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश होता. बोम्मई यांनी मात्र जिल्ह्यातील दोघांनाच संधी दिली आहे. शिवाय त्यांच्याकडे महत्वाचे खातेही दिलेले नाही. त्यामुळे बोम्मई यांच्याकडून बेळगाववर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT