Suresh Pujari Arrested esakal
महाराष्ट्र बातम्या

छोटा राजनचा सहकारी सुरेश पुजारी अटकेत; फिलीपाईन्समधून आणलं भारतात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Underworld Don Chhota Rajan) आणि रवी पुजारीचा (Ravi Pujari) जवळचा सहकारी सुरेश पुजारीला (Suresh Pujari) फिलीपाईन्समधून भारतामध्ये आणण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितलंय की, मुंबई आणि कर्नाटकामध्ये खंडणीद्वारे वसुली करण्याची अनेक प्रकरणे पुजारीच्या नावावर आहेत. गँगस्टर सुरेश पुजारीच्या नावावर मुंबईव्यतिरिक्त ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवलीमध्येही याप्रकारचे गुन्हे दाखल असून त्याला फिलीपाईन्समधून (Philippines) अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारी रात्री उशीरा भारतात आणलं गेलंय.

मुंबईतील अंडरवर्ल्डमधील आणखी एक नाव सुरेश पुजारी उर्फ ​​सतीश पै आता भारतात आहे. काही दिवसांपूर्वी, यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि न्यायाधिकार विभागाच्या संयुक्त कारवाईत त्याला फिलीपिन्समधून अटक करण्यात आली होती. गेल्या वेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुजारीला भारतात आणण्यात भारतीय एजन्सीला यश आले नव्हते. यावेळी त्याला भारतात आणण्यात भारतीय एजन्सीला यश आले आहे. सुरेश पुजारी सध्या दिल्लीत आहेत, त्याला थेट दिल्लीत आणण्यात आलं आहे.

सुरेश पुजारी यांच्यावर मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड सुरेश पुजारीला फिलिपिन्स मध्ये अटक झाली होती. मुंबईत सुरेश पुजारीवर ४० गुन्ह्यांची नोंद असून त्यातील १६ गुन्हे हे खंडणीचे आहेत. दिग्दर्शक महेश भट यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यामागेही पुजारीचा हात आहे.

याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, पोलिसांनी काल संध्याकाळी कुख्यात गुन्हेगार सुरेश पुजारीला दिल्लीतून अटक केलीय. आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल. त्याची टोळी धमकीद्वारे खंडणी मागायची. आता त्याच्यावरील कारवाईमुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT