Ganpati Visarjan truck accident  
महाराष्ट्र बातम्या

Ganpati Visarjan 2023 : गणेश विसर्जन करून येणाऱ्या ॲपेला ट्रकची धडक; अपघातात...

रवींद्र देशमुख

बुलडाणा - राज्यभरात आज गणेश विसर्जनाचा जल्लोष आहे. अनेक ठिकाणी विसर्जनाची तयारी सुरू असताना बुलडाणा जिल्ह्यातून गणेश विसर्जन करून परतताना मंडळाच्या वाहनाला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात, ट्रकने पेट घेतला.

नागपुर-मुंबई राष्ट्रीय महामार्गवरील खामगाव येथील जनुना तलाव येथून गणेश विसर्जन करून शहरात परत येताना जनुना चौफुल्लीवर अकोलाकडे जाणाऱ्या भरभाव ट्रकने ॲपेला जोरदार धडक दिली. या धडकेत ॲपे मधील गणेश मंडळाचे काही लोक हे जखमी झाले.

जखमी गणेशभक्तांना तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला होता. घटनास्थळी अग्निशमनदल पोहचले होते. गाडीतील फायर पंप नादुरुस्त असल्याने आग विझवण्यात वेळ लागला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.

सदर ट्रकमधील साबण जळून खाक झाल्या आहेत. यावेळी अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT