Gautami Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil Video : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड कोसळलं; अनेक जणांना...

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगरमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात एक अपघात झाला आहे. शेड कोसळल्याने अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आलीय. तिच्या लावणी आणि स्टेज शोच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. कार्यक्रमादरम्यान अनेक अपघाताच्या घटना यापूर्वीदेखील घडलेल्या आहेत. आज पुन्हा शेड कोसळल्याची घटना घडली आहे.

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याच्या शेडवर काही तरुण मोठ्या संख्येने चढले होते. ते शेड कोसळल्याने तरुण जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी गौतमीची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. त्या तरुणास विमानतळ पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली. याबरोबरच एका विधीसंघर्षीत मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

गौतमी ही अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली. गल्लीबोळात तिच्या नावाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र प्रसिद्धीचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. तिच्या कार्यक्रमात भांडणं, अपघात असे प्रकार सर्रास घडतात. आजदेखील वैजापूरमध्ये शेड कोसळल्याने लोक जखमी झाले आहेत.

अब्दुल सत्तार म्हणाले होते...

सिल्लोडला मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता अजून एकदा ठेवू आणि अजित पवारांना निमंत्रण देऊ. गलतिया सबसे होती है, अजित पवार की छुप जाती है सत्तार की छप जाती है, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.

अजित पवार यांनी अनेकदा गौतमी पाटीलबद्दल भाष्य केलेलं आहे. त्यामुळे गौतमीचा काही विषय आला की अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेतली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैष्णो देवी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी; वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गात बदल, वेळापत्रकाही बदलले

Latest Marathi News Live Update : येवल्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्याने बाजरी पिकाला फटका

Beed News: स्वप्ने भंगली; धरणावरील यंत्रसामुग्रीला गंज; जलविद्युत प्रकल्प धूळखात; लोणी सावंगी उपसा सिंचन योजनेवरच आता प्रकल्पाची भिस्त

‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम

Chhatrapati Sambhajinagar: बोलार्डच्या नावाने कोट्यवधींची ‘खिळेबंदी’!; ‘लेफ्ट टर्न’वरील प्रयोग फसला ; उरल्या फक्त आठवणी

SCROLL FOR NEXT