Gautami Patil 
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : पुण्यात नोकरीही लावून दिली होती पण ते...; वडिलांविषयी गौतमी स्पष्टचं बोलली

रवींद्र देशमुख

मुंबई - आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावणारी गौतमी पाटील सातत्याने चर्चेत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. यावरून गौतमीवर टीकाही झाली होती. मात्र आज गौतमीने आपल्या वडिलांविषयी आणि बालपणाविषयी अनेक आठवणी सांगितल्या. एबीपी माझा वृत्तवाहिनीवर ती बोलत होती.

गौतमी म्हणाली, धुळ्यातील सिंदखेडा आणि चोपड्यात माझं बालपण गेलं. मी पुण्यात येईल, याचा मी कधीही विचार केला नव्हता. आमची फॅमिली पुण्यात आली, जशी परिस्थिती समोर आली तशी मी घडत गेले. मी दहावीपर्यंत शिकले. आठवीनंतर दहावी पुण्यात केली.

दरम्यान मला माझ्या वडिलांविषयी काहीही माहिती नाही. मी आठवीला असताना वडिलांना पाहिलं आहे. माझे दोन्ही मामा पुण्यात होते. आमचे पुढे काय होणार, हा सगळा विचार करुन आम्ही पुणे शहरात यायचा निर्णय घेतला होता.

मी माझ्या वडिलांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखलंही नव्हतं. मलाही वाटायचे वडील शाळेत यावे. पण तसे झाले नाही. वडील आहेत हे मला माहिती होतं. पण दुसरी कारणं माहिती नव्हते. पण खरा विषय म्हणजे ते खूप माद्य प्राशन करायचे. त्यांना पुण्यात नोकरी लावून दिली होती. मात्र ते व्यवस्थित राहिले नाहीत. त्यांना गावाला जायचेच होते. आमच्यासोबत त्यांना राहायचे नव्हते. त्यांनी काय केलं ते मी विसरुन गेले. आता ते नाहीत असंही गौतमीने सांगितलं

दरम्यान माझी आई सगळं काम करायची. तिनेच कंपन्यांमध्ये काम करून माझं पालनपोषण केल्याचं गौतमीने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT