CP M. rajkumar esakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्तांचा चांगला निर्णय! रात्रीच्या वेळी गस्तीसाठी १० जणांचे स्वतंत्र पथक; रेल्वे अन्‌ बस स्थानक, बाजार समितीत पहाटे १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांची गस्त

रेल्वे स्टेशन, बाजार समिती व मुख्य बस स्थानक, या परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते. पण, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काहीच उपाययोजना नव्हत्या. ‘सकाळ’ने त्यावर वृत्त प्रकाशीत केले होते. त्याची दखल घेऊन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दहा जणांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यांना रात्रगस्तीची जबाबदारी दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : रेल्वे स्टेशन, बाजार समिती व मुख्य बस स्थानक, या परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते. पण, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काहीच उपाययोजना त्याठिकाणी नव्हत्या. ‘सकाळ’ने त्यावर वृत्त प्रकाशीत केले होते. त्याची दखल घेऊन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दहा जणांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यांना रात्रगस्तीची (रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत) जबाबदारी दिली आहे.

सोलापूरच्या रेल्वे स्थानकाबाहेर शहर पोलिसांची चौकी होती, पण ती सध्या अस्तित्वात नाही. महापालिकेच्या परिवहन मंडळाचे कार्यालय देखील बंद पडले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी बेशिस्त रिक्षा चालकांचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. अनेकदा प्रवाशांसमवेत अरेरावी देखील केली जायची, प्रवाशांची फसवणूकही झाल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आता पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी वाहतूक पोलिस व सदर बझार पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी रेल्वे स्थानकावर रात्रीच्यावेळी नेमले आहेत. याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस स्थानक परिसरात दोन वाहतूक अंमलदार व फौजदार चावडी पोलिसांचे काही कर्मचारी असतात. बाजार समितीत दोन वाहतूक पोलिस व जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे काही अंमलदार नेमण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचीही भीती दूर झाली असून रिक्षाचालकांची मनमानी देखील थांबल्याचे चित्र आहे.

रात्रगस्तीसाठी स्वतंत्र १० जणांची नियुक्ती

रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजार समिती अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार १० अंमलदार व एका अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. रात्रीच्यावेळी तिन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन अंमलदार असतात आणि अधिकाऱ्यांसमवेत तीन कर्मचारी असतात. रात्रभर ते विविध ठिकाणी गस्त घालतात.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

बस प्रवाशांनी गर्दीत सावधगिरी बाळगावी

अक्कलकोट पाणी टाकी, सोलापूर बस स्थानक, रंगभवन, रेल्वे स्थानकासमोरुन एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांच्या पर्समधील दागिने, रोकड, खिशातील मोबाईल, पैसे, गळ्यातील दागिने चोरत आहेत. दरमहा तीन-चार अशा घटना घडतात. पण, प्रवाशांची गर्दी इतकी असते की पोलिसांना देखील त्या चोरट्याचा लवकर शोध लागत नाही. अशावेळी प्रवाशांनी गर्दीत बसमध्ये चढताना पर्स, खिशातील मोबाईल, पैसे, महिलांनी गळ्यातील दागिन्यांवर लक्ष ठेवायला हवे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane New: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT