Vidhan Parishad Election 2022 
महाराष्ट्र बातम्या

'आज कुणी पावसात भिजलं तरी कोणताही परिणाम होणार नाही'

खासदार राऊतांनी कितीवेळा अब्रु घालवली आहे? पडळकरांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

खासदार राऊतांनी कितीवेळा अब्रु घालवली आहे? पडळकरांचा सवाल

भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीतरी पावसात भिजलं तरीही त्याचा कोणताच परिणाम होईल असं मला वाटत नाही, असा अप्रत्यक्ष टोला भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला आहे. आज विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्ष उमेदवारांची खासदार राऊतांनी कितीवेळा अब्रु घालवली आहे, जो काही निकाल आहे तो काही वेळात समोर येणार आहे, असंही ते म्हणाले आहेत. (Vidhan Parishad Election 2022)

पडळकर म्हणाले महाविकास आघाडीत काहीतरी गोंधळ उडला असल्याने बैठक घेण्यात आली आहे. भाजप ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. याआधी 2019 ला राज्यांतील जनेतेचा विश्वासघात झाला होता. जनतेनं दिलेल्या मतांना धुडकावून, पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केलं होतं. यावेळी आमदारांना मत व्यक्त करण्याची पहिल्यांदा योग्य संधी मिळाली आहे. या लोकांतून आमदार निवडून आले होते, त्या लोकांनी 161 आमदार हे युतीचं सरकारसाठी निवडून दिले होते. त्यामुळे आज हे सगळे आमदार मतदानातून व्यक्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, खासदार राऊतांनी अपक्ष आमदारांची आब्रु घालवली आहे. लोकांतून निवडून आलेल्या आमदरांवर आरोप करुन राऊतांनी या अपक्ष आमदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. लोकांच्या मतांमुळे हे आमदार निवडून आले आहेत. मात्र असे आरोप करुन जनतेच्या मनात आमदारांविषयी मत कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे सर्व आमदार आज मतदानाच्या माध्यमातून व्यक्त होतील असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT