भगतसिंग कोश्यारी  esakal
महाराष्ट्र बातम्या

OBC विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; कायद्याचा मार्ग मोकळा

सकाळ डिजिटल टीम

राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर सही केली असून यामुळे कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर सही केली असून यामुळे कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. निवडणूक आयोग सुधारणा विधेयक राज्यपालांकडे सहीसाठी पाठवण्यात आलं होतं. या मुद्यावरून मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. आता राज्यपालांनी या विधेयकावर सही केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यपालांच्या भेटीला शिष्टमंडळ गेले होते अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.

राज्य सरकारने विधिमंडळात OBC आरक्षण संदर्भात विधेयक मंजूर केले होते. या विधेयकावर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर सही केलीय. विधेयक मंजूर झाल्यानतंर राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार असणार आहेत. निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारकडे येतील. यामुळे आता प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही तोपर्यंत निवडणूक जाहीर करता येणार नाही.

प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असतील. मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणेच राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक आणलं होतं, त्याला विधीमंडळात मंजुरी मिळाल्यानंर राज्यपालांकडे सहीसाठी पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT