Aarogya Bharti 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Aarogya Bharti 2023 : आरोग्य विभागाच्या पदभरतीवर प्रश्नचिन्ह; उमेदवारांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफांची भेट

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामध्ये मे २०२३ पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु या पदभरतीमध्ये आपल्यावर अन्याय होतोय, असं म्हणत काही उमेदवारांनी रविवारी मंत्र्यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूरः वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामध्ये मे २०२३ पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु या पदभरतीमध्ये आपल्यावर अन्याय होतोय, असं म्हणत काही उमेदवारांनी रविवारी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग अर्थात DMERमध्ये रिक्त जागांच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवली जात आहे. १० मे २०२३ रोजी याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले होती. साधारण ४० पेक्षा जास्त पदांसाठी ही जाहीरात देण्यात आली होती. जाहिरातीमधील विसंगतीमुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांवर आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा सूर आहे.

चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलेअर (NCL) आणि चालू आर्थिक वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमाणपत्र (EWS) स्वीकारणं अपेक्षित असतानाही ते स्वीकारलं जात नाही, इश्यू डेटचा मुद्दा मुद्दा पुढे करुन पात्र उमेदवारांना अपात्र केलं जात आहे; असं उमेदवारांचं म्हणणं आहे.

राज्यातील ओबीसी आणि मराठा प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याने रविवारी कोल्हापुरात राज्यभरातील अन्यायग्रस्त विद्यार्थी एकवटले होते. साधारण दोनशेच्या आसपास उमेदवारांनी आवाज उठवला असून सातशेपेक्षा जास्त उमेदवारांवर तांत्रिक कारणामुळे अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे.

राज्यभरातून कोल्हापुरात जमलेल्या उमेदवारांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन खात्याचे मंत्री हसन मुश्रीफांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफांनी लवकरच अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरवलेल्या उमेदवारांना न्याय मिळतो का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohingya Boat Tragedy: समुद्रात आक्रोश! ५०० हून अधिक रोहिंग्याचा बुडून मृत्यू... मान्सूनच्या लाटांचा हाहाकार

FIFA World Cup फायनलपूर्वीच अर्जेंटिनावर होणार मोठी कारवाई? इंग्लंडवरील विजयानंतर 'ते' बॅनर झळकावणं पडणार महागात?

Latest Marathi News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला! आणखी एका वारकरी महिलेचा मृत्यू, आकडा पोहोचला 4 वर

का झाला उर्मिला आणि आदिनाथ कोठारेचा घटस्फोट? महेश कोठारेंच्या बुक लॉन्च कार्यक्रमात झालेल्या चर्चा, नेमकं काय बिनसलं?

Rahul Gandhi Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून राहुल गांधी दूर का? काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT