maharashtra health department
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याचा निर्णय २०२३ मध्ये झाला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जनआरोग्य समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नगरसेवकाला कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भातील नियमावली आरोग्य विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
आपला दवाखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा सुधारून नागरिक तथा रुग्णांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक निराकरण केले जाणार आहे. जनआरोग्य समिती महापालिका क्षेत्राकरिता नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा, तसेच नगरपरिषदा, नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रांकरिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा अविभाज्य घटक म्हणून कामकाज करणार आहे. जनआरोग्य समिती नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या दिशानिर्देशानुसार कामकाज करणार आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात कार्यवाही अशी...
महापालिकेच्या समितीत सहअध्यक्ष म्हणून प्रभागस्तरीय वैद्यकीय अधिकारी काम करणार आहेत. समितीचे सदस्य सचिव म्हणून दवाखाना स्तरावरील वैद्यकीय अधिकारी कामकाज पाहणार आहेत. या समितीत आरोग्य सेवक, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी यांच्यासह समाजातील विविध घटकांना संधी दिली जाणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या जनआरोग्य समितीत सहअध्यक्ष म्हणून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून दवाखाना स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या समितीतदेखील महापालिकेप्रमाणेच विविध घटकांतील व्यक्तींना संधी दिली जाणार आहे.
दोन वर्षांचा असणार कार्यकाळ
समिती सदस्यपदाचा कार्यकाळ किमान दोन वर्षांचा असणार आहे. सर्व सदस्यांना या समितीचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. महापालिका क्षेत्रातील आपला दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, समितीचे सदस्य सचिव या नात्याने, जनआरोग्य समिती सदस्यांची विहित निकषानुसार निवड करायची आहे. या समितीला महापालिकेच्या नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीची मान्यता घ्यावी लागणार आहे. नगरपरिषदा/नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रातील आपला दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, समितीचे सदस्य सचिव या नात्याने, जनआरोग्य समिती सदस्यांची विहित निकषानुसार निवड करायची आहे. या समितीला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीची मान्यता घ्यावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.