HEAT WAVE AND GLOBAL WARMING Sakal
महाराष्ट्र बातम्या

मान्सून येता येता राहिला! राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट

विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून नागरिकांना पावसाची अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

उन्हाने काहिली झालेल्या महाराष्ट्राला आता मान्सूनची चाहूल लागली आहे. आता येईल, मग येईल, असं करत चातकाप्रमाणे राज्य मान्सूनची वाट पाहतंय. पण मान्सून सारखा चकवाच देतोय. पण आता तर अगदी उंबरठ्यावर आलेला मान्सून खोळंबल्याचं चित्र आहे. राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट आलीये. (Monsoon In Maharashtra)

विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave in Vidarbha) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या अरबी समुद्रातल्या प्रवेशाला पोषक वातावरण नसल्यानं महाराष्ट्रातला मान्सून लांबणीवर पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मान्सून कर्नाटकातल्या कारवारमध्ये खोळंबलाय.

बंगालच्या उपसागराच्या परिसरात मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. थेट हिमालयापर्यंत पाऊस पोहोचला आहे. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांमुळे उत्तर भारतात विदर्भासह काही ठिकाणी उष्णतेच्या लाट आहे. ही लाट दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT