nanded hindu muslim  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News: हिंदु मुलाचे मुस्लिम मुलीसोबत अफेअर; जमावाने बेदम मारून केला खून

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः दोन वेगवेगळ्या धर्मातील प्रेमाला कायम विरोध होतो. पण एका प्रकरणात जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारुन तरुणाचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे.

मराठवाड्यातील नांदेडमध्ये एक हिंदू धर्मिय मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु हे प्रकरण काहींना रुचलं नाही. लाठ्या-काठ्यांनी त्या तरुणाला इतकं मारलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मृत तरुणाचं नाव स्वप्नील होतं. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. दहा जणांनी मिळून स्वप्नीलला रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली होती. हे सगळे आरोपी संबंधीत तरुणीचे नातेवाईक होते की नाही, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. नांदेडचे डीएसपी चंद्रावन देशमुख यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

पोलिसांनी सांगितलं की, २३ नोव्हेंबर रोजी स्वप्नील नावाच्या तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तातडीने तपास करीत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक केली. आतापर्यंत सात जणांना अटक केलेली आहे. उर्वरित आरोपींना आम्ही लवकरच अटक करु. सध्या या प्रेम प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT