Earthquake Sakal
महाराष्ट्र बातम्या

Hingoli Earthquake: हिंगोली भूकंपाने हादरला, 16 ते 18 गावांना जाणवले धक्के

हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. 16 ते 18 गावांना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे.(Hingoli earthquake 16 to 18 villages felt mild tremors )

पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच, नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंगोलीच्या वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील जवळपास सोळा ते अठरा गावांच्या परिसरात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील कुरंदासह परिसरातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, कळमनुरी तालुक्यातील बोल्डा परिसर औंढा तालुक्यातील पिंपळदरी जलालदाभा , दुधाळा आदी गावांच्या परिसरात सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत, कळणनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात मागील 8 ते 10 वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत. भूगर्भातील सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT