dilip walse patil on bullock cart racing esakal
महाराष्ट्र बातम्या

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला (Bullock cart racing) काही अटी आणि नियम घालून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासाठी हा मोठा दिलासा असल्याचे ते म्हणाले.

मागील अनेक दिवसांपासून बैलगाडी शर्यती बंद होत्या. अनेक दिवसांपासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित होतं. राज्य सरकारने अत्यंत चांगली वकील न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नेमले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे, असं गृहमंत्री म्हणाले.

प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबावेत असं म्हणत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदीची मागणी केली होती. बैलागाडा शर्यतींचे राज्यातील ग्रामीण भागात मोठे आकर्षण आहे. यासाठी ग्रामीण भागात अनेक आंदोलनेसुद्धा झाली. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. मात्र बंदीमुळे यावर बंधने आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बैलागाडा शर्यतीवर बंदी घातली होती. राज्य सरकारने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता न्यायालयाने काही अटी-शर्ती घालत परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT