Cabinet Expansion Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: गृह-सहकार खाते कोणाकडे? अजित पवारांच्या एंट्रीपासुन भाजपने पहिल्यांदाच घेतली ठाम भूमिका

गृह-सहकार खात्याबाबत भाजपने पहिल्यांदाच घेतली ठाम भूमिका

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा काळ उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. लवकरात लवकर खातेवाटप व्हावं, यासाठी राष्ट्रवादीकडून आग्रह धरला जात आहे, त्याचबरोबर शिवसेना हवी असलेली खाती राष्ट्रवादीला हवी असल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक ही खाती राष्ट्रवादीला हवी असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एक खाते अजित पवार गटाला हवं असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती समोर येत आहे.(Latest Marathi News)

तर गृह आणि सहकार खात भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. गृह खात्याच्या अदलाबदलीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ही दोन महत्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबतचे वृत्त साम टिव्ही या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.(Latest Marathi News)

तर अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती समोर आली आहे. सर्वात आधी भाजपा आणि शिंदे गटातील राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार करावा आणि त्यानंतरच खाते वाटप करावा, असा सूर शिवसेनेच्या आमदारांचा असल्याची माहिती समोर येत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT