Deepak Kesarkar sakal
महाराष्ट्र बातम्या

Education : पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद - दीपक केसरकर

राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार आहेत.

मुंबई - राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १६ सप्टेंबर २०२२ रोजी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या शिफारशी लक्षात घेतल्या जाणार आहेत. सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक, शाळा चुकीचा अर्थ काढतील, अथवा त्यातून पळवाटा काढतील, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता आहे. तशा पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न

नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि ‘परख’ या संस्थेने केलेल्या शिफारशी, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थिहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने यासाठी सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT