ssc-hsc-students sakal media
महाराष्ट्र बातम्या

SSC & HSC Exam: दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा 'वॉच'

अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परीसरात इतरांसाठी प्रतिबंधात्मक आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांवर पुणे पोलिसांचा "वॉच' असणार आहे. केंद्रावरील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचे तेथे लक्ष असणार आहे, याबरोबर संबंधित परीक्षा केंद्रांच्या परीसरात विद्यार्थी, परीक्षेसंबंधी व्यक्ती वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. (HSC And SSC Exam Updates)

इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाली असून हि परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. तर दहावीची परीक्षेला 15 मार्चला सुरुवात होत असून हि परीक्षा 4 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गतच्या क्षेत्रामध्ये बारावीचे 262 परीक्षा केंद्र असून दहावीचे 512 परीक्षा केंद्र आहेत. असे दहावी व बारावीची तब्बल 774 केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षा प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी, यादृष्टीने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडून आलेल्या पत्राची दखल घेत पुणे पोलिसांकडून खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात विद्यार्थी, परीक्षेसंबंधी व्यक्ती वगळता इतरांसाठी पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे विविध प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंडसंहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहणार आहे. पोलिसांनी दिलेले आदेश खालीलप्रमाणे ः

* परीक्षा केंद्रांच्या इमारतींच्या 100 मीटर परीसरात विद्यार्थी, जिल्हाधिकारी किंवा परीक्षा नियंत्रक यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती किंवा वाहनांव्यतिरीक्त इतरांना जाण्यास, परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मनाई आहे.

* परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात सार्वजनिक एसटीडी, फॅक्‍स, झेरॉक्‍स बुथ, पेजर, मोबाईल फोन, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा यांचा वापर करता येणार नाही.

* परीक्षा केंद्राच्या परीसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

* परीक्षा केंद्राच्या परीसरात परीक्षेसंदर्भात कोणताही मजकुर लिहीण्यास किंवा छापील मजकुर चिकटविण्यास मनाई असणार आहे.

"दहावी व बारावीच्या परीक्षा हा अतिशय संवेदनशील विषय आहे. संबंधीत परीक्षेचे कामकाज योग्य रितीने पार पडावे, तेथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास परीक्षेच्या प्रकियेत धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळेच संबंधित ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत.''

-डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT