CM Eknath Shinde with Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ३४२ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’! रुग्णांना मिळणार ‘या’ सेवा

नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर झालेल्या केंद्रांचे टप्प्याटप्प्याने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना‘त रुपांतर केले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आठ तर राज्यात ३४२ ‘आपला दवाखाना’ सुरु होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर झालेल्या नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्रांचे टप्प्याटप्प्याने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना‘त रुपांतर केले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तर राज्यात ३४२ ‘आपला दवाखाना’ सुरु होणार आहे. उद्या (ता. १ मे) त्याचे लोकापर्ण केले जाणार आहे.

‘आपला दवाखाना’अंतर्गत पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये लोकार्पण सोहळा त्याठिकाणी रंगणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हे दवाखाने सुरू केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बागडे यांनी दिली.

त्यात एकूण ३४२ ‘आपले दवाखाने’ सुरु होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा ऑनलाईन पार पडणार आहे. नगरपालिकांच्या किंवा भाड्याच्या इमारतीत हे दवाखाने होतील. त्यात ‘ओपीडी’ स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे. ‘आपला दवाखाना’मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, ३०० प्रयोगशाळा चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण सेवा, तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणी देखील करण्यात येणार आहेत.

‘आपला दवाखान्या’त मिळणार ‘या’ सेवा

‘आपला दवाखान्या’त मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी, याशिवाय क्ष- किरण (एक्स-रे), सोनोग्राफी व पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. त्याशिवाय बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, टेली कन्सल्टीशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण सेवा देखील तेथे उपलब्ध असतील. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषता संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील होईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी सांगितले.

‘या’ तालुक्यांमध्ये ‘आपला दवाखाना’

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगर परिषदेतील मराठी शाळा, माणिक पेठ येथे ‘आपला दवाखाना’ सुरू होणार आहे. तसेच बार्शी शहरातील लोढा प्लॉट येथे, माढा शहरातील नागरी आरोग्य केंद्र, कुर्डवाडी येथे, माळशिरसमधील नगरपंचायत इमारतीच्या आवारात, मंगळवेढा शहरातील योग भवन नाका येथे, मोहोळ शहरातील दत्त मंगल हॉल, पंढरपूर शहरात नगरपरिषद क्लॉक रूम, सांगोला नाका आणि सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, चांदोलीवाडी येथे हे दवाखाने सुरु होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT