Police Patil  sakal
महाराष्ट्र बातम्या

Police Patil : पोलिस पाटलांचे वाढीव मानधन कागदावरच ; घोषणा होऊन अडीच महिन्यांनंतरही नाही अंमलबजावणी

पोलिस पाटलांच्या मानधनवाढीचा निर्णय राज्य सरकारने मार्च महिन्यात घेतला. त्यामुळे पोलिस पाटलांचे साडेसहा हजार रुपये असलेले मानधन १५ हजार रुपये करण्यात आले. त्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली.

हेमंत पवार

कऱ्हाड : पोलिस पाटलांच्या मानधनवाढीचा निर्णय राज्य सरकारने मार्च महिन्यात घेतला. त्यामुळे पोलिस पाटलांचे साडेसहा हजार रुपये असलेले मानधन १५ हजार रुपये करण्यात आले. त्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली. मात्र शासन निर्णय निघून अडीच महिने झाले. मात्र, अद्याप वाढीव मानधन पोलिस पाटलांना मिळालेले नाही. त्याचबरोबर मार्च महिन्यातील पूर्वीचे साडेसहा हजार रुपयांचे मानधनही पोलिस पाटलांना मिळालेले नाही.

गावागावांतील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्यासह गावातील सण-उत्सव शांततेत पार पडावे, आरोपींचा ठावठिकाण कळवून त्यास पकडून देण्यास पोलिसांना मदत करणे, गावातील भांडण तंटे मिटविणे, पोलिसांना तपासकार्यात मदत करणे, कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता असणाऱ्यांची माहिती देणे, महसूल आणि पोलिस खात्यांना वेळोवेळी आवश्यक ती माहिती देणे यासारखी कामे करणारे गावातील महत्त्वाचे पद म्हणजे पोलिस पाटील पद आहे.

त्या पदावर काम करणाऱ्या पोलिस पाटलांना सरकारने यापूर्वी साडेसहा हजार मानधन केले होते. मात्र, वाढती महागाई आणि पोलिस पाटलांना पदरमोड करून कामानिमित्ताने फिरावे लागत असल्याने त्यांचे मानधन वाढ करावी, अशी त्यांच्या सर्वच संघटनांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी मोर्चे काढून आंदोलनेही केली होती.

त्याचा विचार करून राज्य सरकारने मार्च महिन्यात पोलिस पाटलांचे मानधन साडेसहा हजार रुपयांवरून वाढवून ते १५ हजार रुपये केले. त्याचा शासन निर्णय १५ मार्चला काढण्यात आला. मात्र, त्याला अडीच महिने झाले, तरीही त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. त्याचबरोबर मार्च महिन्याचे साडेसहा हजार रुपयांचे मानधनही शासनाकडून पोलिस पाटलांना मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT