Infletion  sakal
महाराष्ट्र बातम्या

Infletion: अवकाळीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला; धान्य झाले महाग; बजेट कोलमडले

सकाळ डिजिटल टीम

Infletion: अवकाळी पाऊस, पुरामुळे पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट झाली असून त्याचा परिणाम आता किमतींवरही जाणवू लागला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बाजारी, ज्वारी, गहू, तांदळाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामन्यांचे बजेट कोलमडले आहे.

गहू, बाजरीच्या दरामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठ रुपयांनी किलोमागे वाढ झाली आहे. ज्वारीचे दर एकोणीस रुपयांनी वाढले आहेत. असेच काही तांदळाच्या बाबतीतही आहे. सध्या तांदळाच्या दरात सात रूपंयानी वाढ झाली आहे.

-तर नोव्हेंबरमध्ये गहू २६ ते ३५ रुपये किलोला विकला जाणारा गहू मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २८ ते ४३ रुपयांनी विकला जात असून सरासरी ८ रुपयांची दरवाढ झाली आहे. यंदा बाजारी २८ ते ४३ रूपयांपर्यत झाली आहे. गतवर्षी ज्वारी २८ ते ४५ रुपयांना होती, मात्र यंदा ज्वारीच्या दरात सरासरी २९ रुपयांनी वाढ झाली आहे. तर गतवर्षी २९ ते ४६ रुपयांना मिळणारा तांदूळ यंदा ४० ते ५० रूपयांपर्यत गेला आहे.

दरवाढीची कारणे ः

गहू

बिस्कीट बनवण्यासाठी गव्हाचा वापर करण्यात येत असल्याने जास्त प्रमाणात मागणी असल्याने गव्हाचा बाजारात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ झाली आहे.

ज्वारी

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधील रहिवासी बाजरी, ज्वारीचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत होतो. पण यंदा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात यंदा उत्पादन कमी आहे.

तांदूळ

कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यामधील पुरपरिस्थितीमुळे उत्पादन घटल्यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली आहे.

उत्पादनात घट झाल्यामुळे अन्नधान्यांच्या दरात वाढ झालेली आहे. पूरपरिस्थिती, अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले आहे. मागणी जास्त आहे. पण उत्पादन नसल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- हर्ष ठक्कर, धान्य व्यापारी

गत वर्षीच्या तुलनेत गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ या सर्वसामन्यांशी निगडित असणाऱ्या सर्वच अन्नधान्याचे दर वाढलेले आहेत. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढत नसल्यामुळे दुकानांत वस्तू घेताना विचार करावा लागतो.

मनिषा रोडे, गृहिणी

धान्याचे दर २०२२ २०२३

बाजरी २४ ते ३५ २८ ते ४३

गहू २६ ते ३५ ३० ते ४०

ज्वारी २८ ते ४५ ३५ ते ७५

तांदूळ २९ ते ४६ ४० ते ५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

SCROLL FOR NEXT