pandharpur aashadhi wari

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

‘एसपी’ अतुल कुलकर्णींचे नियोजन! मानाच्या 2 पालख्यांना यंदा पहिल्यांदाच 'GPS'; सुरक्षेसाठी ड्रोन, वाहनांच्या पार्किंगसाठी QR Code, चोरट्यांना पकडण्यासाठी वारकरी वेशात 'माऊली स्कॉड', वाचा...

संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत मोठी गर्दी असते. पालखी सोहळा ज्या गावात मुक्कामी असतो, तेथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच पालखी मार्गावरही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये आणि वारकऱ्यांसाठी प्रशासनाला अचूक नियोजन करता यावे, यासाठी यंदा प्रथमच या दोन्ही पालख्यांना ‘जीपीएस’ बसविण्यात आले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत मोठी गर्दी असते. पालखी सोहळा ज्या गावात मुक्कामी असतो, तेथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच पालखी मार्गावरही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये आणि वारकऱ्यांसाठी प्रशासनाला अचूक नियोजन करता यावे, यासाठी यंदा प्रथमच या दोन्ही पालख्यांना ‘जीपीएस’ बसविण्यात आले आहे.

आषाढी वारीसाठी दरवर्षी दहा मानाच्या पालख्यांसह अनेक छोट्या-मोठ्या पालख्या आणि दिंड्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी येतात. यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला पालख्यांचे अचूक स्थान समजण्यास मदत होत आहे. यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे भाविकांनाही पालख्यांचे अद्ययावत स्थान पाहता येत आहे.

१) पार्किंगसाठी ‘क्यूआर कोड’

सोलापूरसह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांना वाहने कोठे उभी करता येतील, कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत, याची माहिती ‘क्यूआर कोड’द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

----------------------------------------------

२) चोरट्यांना पकडण्यासाठी ‘माऊली स्कॉड’

वारीत भाविकांच्या साहित्याची चोरी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे यंदा पोलिसांचे वारकऱ्यांच्या वेशातील ‘माऊली स्कॉड’ वारीत कार्यरत असणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात प्रवेश होताच ‘माऊली स्कॉड’ने संशयित २१ महिला आणि २० पुरुषांना ताब्यात घेतले.

---------------------------------------------

३) ड्रोन आणि ॲन्टी-ड्रोनचा वापर

पालखी सोहळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. त्याद्वारे गर्दीचा अचूक अंदाज घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच वारकऱ्यांची सुरक्षा, पालखी मार्गावरील वाहतूक कोंडी आणि मार्गातील अडथळ्यांची माहिती मिळण्यास मदत होत आहे. दुसरीकडे, खासगी व्यक्तींनी ड्रोनचा वापर करू नये, यासाठी यंदा प्रथमच ॲन्टी-ड्रोन गनचा वापर करण्यात आला आहे.

पालख्यांची माहिती, लोकेशन वेबसाईटवर

संतांच्या पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरे आणि सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वारकरी वेशातील 'माऊली स्कॉड'ही कार्यरत आहेत. यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘आषाढी वारी-२०२६’ या संकेतस्थळावर पालख्यांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Suzuki Price Hike: ऑगस्टपासून मारुती सुझुकीच्या गाड्या महाग होणार! वर्षात दुसरी दरवाढ; कारण काय? किंमतीत किती वाढ होणार, पाहा

Mumbai Local: दिव्यांगांच्या लोकल डब्यांत घुसखोरी, वर्षभरात २३ हजार प्रवाशांकडून २४ लाखांचा दंड वसूल

Jalgaon News : सायबर गुन्हेगारांची आता खैर नाही; गृहमंत्री अमित शहा घेणार थेट जिल्हापातळीवर आढावा

Live Updates Marathi : राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन

Crime Crackdown: परिमंडळ सातमध्ये ‘मिशन क्रॅकडाऊन’ला सुरुवात; वडगाव शेरी-विमाननगरमध्ये जुगार अड्डे, अमली पदार्थांच्या जाळ्यावर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT